पोस्ट्स

हापूस आंबा

 आंबा आवडत नाही असा माणूस विरळाच.तुमचे पोटभर जेवण झाले असले तरी तुमच्या समोर मस्त रसाळ आंबा आला की त्यासाठी पोटात जागा होणारच. हापूस आंबा कितीही महाग मिळत असला तरी तो जेंव्हा बाजारात येतो त्यावेळी त्यावर उड्या पडणारच.पण आंबे एवढ्या वेगवेगळा जातीत येतात की ज्याला जे आंबे आवडतात ते त्याने खावेत.                               आपल्या मराठीत आंबा तर हिंदीत आम् हे खरे म्हणजे संस्कृतातील आम्र या शब्दाचे अपभ्रंश आहे.याचे इंग्रजीत मँगो कसे झाले तर आंब्याला तमिळ भाषेत मान- गाय म्हणतात त्यावरून त्याचे इंग्रजीत मँगो झाले . आंबा हे फळ ट्रॉपिकल म्हणजेच  उष्ण प्रदेशात मिळतो .आंब्याचे मूलस्थान भारतातील आसाम किंवा ब्रम्हदेश किंवा  सयाम असावा असे मानले जाते.   आंबा भारतात   सुमारे चार हजार वर्षांपूर्वी आला.  आंबा मुख्यते दोन प्रकारात येतो एक रायवळ म्हणजे झाडी आंबे  तर दुसरा कलमी आंबे.  कलमी आंब्याच्या शेकडो जाती असल्या तरी लोकप्रिय   वीस तीस जातीच बाजारात आपणास दिसतात पण सर्वात लोकप्रिय आंबा म्हणजे हापूस. या शिवाय पायरी, लंगडा, चौसा, नीलम, तोतापुरी ,केशर अश्या अनेक जातीचे आंबे बाजारात येतात. पूर्वी तर म